आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:कीर्तन यात्रेतून गुरुनानक यांना अभिवादन

इंदिरानगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुनानक आया नानक आया... अन् वाहे गुरूचा जयघोष करत गुरुनानक महाराजांना अभिवादन करण्यात आले. इंदिरानगर येथील गुरुगाेबिंदसिंग फाउंडेशन स्थित गुरुद्वारा येथून भव्य नगर कीर्तन यात्रेस फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टीत प्रारंभ झाला. दि.८ राेजी हाेणाऱ्या गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले.

यात्रेत अग्रभागी दुचाकी वाहनधारक सहभागी झाले होते. मनमाड येथील गुरुद्वारा गुपत्सर साहिब, जत्थेदार बाबा रणजीत सिंगजी, नांदेड येथील श्री हुजूर साहिब पालखी यांचा अग्रभागी पदयात्रेत सहभाग होता. नगर कीर्तनाच्या यात्रेस इंदिरानगर येथील गुरुगोबिंदसिंग फाउंडेशन येथील गुरुद्वारा येथून प्रारंभ होऊन कलानगर, रथचक्र चौक मार्गाने बापू बांगला,विनयनगर,मुंबईनाका या मार्गावरून जात असताना फुलांच्या पायघड्या घालून यात्रा शुभारंभ ते समारोपपर्यंत स्वागत केले गेले.

यात्रेत गुरुद्वारातील कीर्तन भजनी मंडळ,वारकरी संप्रदाय,पारंपरिक वाद्य व ढोल पथक, गुरुनानक यांच्या प्रतिमेचे फुलांनी सजवलेले दहा ते पंधरा चित्ररथ हाेेते. शहरातील सर्व गुरुद्वाराचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह शीख समाज बांधव परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगर कीर्तनाचा समारोप विविध धार्मिक कीर्तनाने व विशेष लंगरच्या प्रसादाने शिंगाडा तलाव गुरुद्वारा येथे करण्यात आला.ही यात्रा पाच किलोमीटर पेक्षाही जास्त मोठी होती.

स्वतंत्र बसेसची हाेती व्यवस्था
गुरू गोबिंदसिंग फाउंडेशन येथे येण्याकरिता शहरातील सर्व मुख्य गुरुद्वारा येथून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली हाेती. शहरातील विविध मान्यवरांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती हाेती. या कीर्तनाचा तसेच विशेष लंगरचा लाभ शहरातील सर्व नागरिकांनी घेतला.शहरातील सर्व समूह संगत, गुरुद्वारांचे अध्यक्ष, सदस्यांद्वारा तसेच नगर कीर्तनाचे सहआयोजक गुरू गोबिंदसिंग फाउंडेशनद्वारा करण्यात आले. गुरुनानक जयंतीनिमित्त गुरू गाेबिंदसिंग फाउंडेशनमधील गुरुद्वारात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...