आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- भारतीय घटनेचे शिल्पकार, दलित, दीनदुबळ्यांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन महानगर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयात साजरा झाला.
प्रारंभी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शशांक हिरे, महेश हिरे, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि समाजातील दीनदुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ते राज्य घटनेचे शिल्पकार होते. घटना लिहिताना त्यांनी दलित आणि वंचित घटकांना जास्तीतजास्त आरक्षण आणि सरंक्षण कसे मिळेल याची काळजी घेतली.
आज दलित आणि समाजातील उपेक्षित घटक सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत आणि आज या घटकाला मान सन्मानही मिळत आहे त्याला डॉ.बाबासाहेबांचे अथक प्रयत्न आणि त्यांनी त्यासाठी केलेला संघर्ष कारणीभूत आहे असे, शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रास्तविक भाजपा अनुसूचित जाती महानगर अध्यक्ष शशांक हिरे यांनी केले, सुत्रसंचालन गजानन रणबावळे यांनी केले तर आभारप्रदर्शन नामदेव हिरे यांनी केले.
कार्यक्रमास लक्ष्मण सावजी, सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, जगन आण्णा पाटील, चंद्रकांत थोरात, फिरोज शेख, राकेश पाटील, अरुण शेंदुर्णीकर, राजेश आढाव, वसंत उशीर, संतोष नेरे, दिपक पाटील, हेमंत शुक्ल, कुंदन खरे, कविता तेजाळे, अनिल मोरे, दशरथ गांगुर्डे, लक्ष्मण पगारे, अंबादास आहिरे, दशरथ लोखंडे, रतन काळे, गणेश तांबे, मनोज शिरसाठ, अमित घुगे, विक्रम नागरे, सुरेश आण्णा पाटील, शैलेंद्र जुन्नरे, सोनल दगडे, अर्चना दिंडोरकर, पुनम ठाकुर, संगीता जाधव, जयश्री धारणकर, रोहिणी रकटे, दिनेश जाधव, अनिल मोरे, सागर धर्माधिकारी, देवेंद्र चुंभळे, विजय कुलकर्णी, दिपक सोनवणे, सदानंद तायडे आदीसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.