आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त वृक्षाराेपण:इनरव्हील सदस्यांकडून जवानांच्या कार्याला सलाम

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब ऑफ नाशिकने ७५ वा स्वतंत्रता दिवस ७ महाराष्ट्र नाशिक एनसीसी बटालियन यांच्यासमवेत साजरा केला. यावेळी इनरव्हील भगिनींनी २२ लष्करी बांधवांना राख्या बांधल्या.

यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल अलोककुमार सिंघ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत झाल्यावर इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट धारा मालुंजकर यांनी औक्षण करून राखी बांधली. सेक्रेटरी डॉ. ज्योत्स्ना पवार, व्हाइस प्रेसिडेंट अनिता भसे, आयएअो कल्पना माळोदे व सदस्यांनी जवानांना राखी बांधली. मीनाताई ठाकरे स्टेडियम प्रांगणात वृक्षाराेपण करण्यात येऊन पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...