आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश संपादन:संदीप कॉलेज; बारावीचा निकाल 100 टक्के

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत संदीप फाउंडेशन संचलित संदीप ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. परीक्षेत वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला.

वाणिज्य शाखेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी आकांक्षा अशोक भोई हिने ८७.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक रिया शरद शिंगार (८३.५0), तृतीय क्रमांक वेदश्री योगेश जोशी (८१.३३), चौथा क्रमांक स्नेहा अजय चव्हाण (८०.८3) आणि पाचवा क्रमांक आकांक्षा पोपट शिंदे (७९.५०) हिने मिळवला.

विज्ञान शाखेमध्ये आकाश बाजीराव पिंगळे याने (८४.३३) प्रथम क्रमांक संपादन केला. द्वितीय क्रमांक उदय प्रज्ञेश शहा (७७.१७), तृतीय क्रमांक अनुष्का अनिल बच्छाव (७६.१७), चौथा क्रमांक शुभम दशरथ वागळे (७५.६७) आणि पाचवा क्रमांक प्रथमेश देवीदास मानवटकर (७५.५०) याने मिळवला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप झा, मेंटर प्रा. प्रमोद करोले व प्रभारी प्रा. आरिफ मन्सुरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...