आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर महाराष्ट्रातील प्रतीत यश शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या, संदीप फाउंडेशन आणि अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या तीन हजारावर उद्योजक सभासद असलेल्या औद्योगिक संघटनेमध्ये महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या हितासाठी विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. आयमाची यासंदर्भातील मागणी संदीप फाऊंडेशनने मान्य केली असून त्याबाबतचा सामंजस्य करार आयमा सभागृहात पार पडला. यावेळी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ,औद्योगिक संस्था कमिटी चेअरमन जगदीश पाटील, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, दिलीप वाघ आणि संदीप फाऊंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.
अल्प शुल्कात प्रवेश
जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर कर्मचारी शैक्षणिक क्षेत्रात कुठेही कमी पडू नये या उद्देशाने आयमाने संदीप फाऊंडेशनबरोबर हा करार केला आहे. त्यानुसार इंडस्ट्री इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम अंतर्गत कर्मचाऱ्यांना अल्प शुल्कात बीसीए, एमबीए, सीसीए, एम.एससी (फॅशन), एम.एससी (फिजिक्स,केमिस्ट्री, मॅथ्स मायक्रोबायोलॉजी)आदी अभ्यासक्रमांसाठी त्यांना प्रवेश मिळवून देण्यात येणार आहे. काही कारणांमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या कामगारांना यामुळे प्रशिक्षित होण्याची व आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे असे आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.