आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाने गुरुजींच्या प्रत्येक आेळीतून मुलांवर याेग्य संस्कार हाेतात. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांचे सवंगडी बनावे, अशी साद पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम माने यांनी साने गुरुजी यांच्या कल्पनेतील ‘आंतरभारती’ शाखेच्या शुभारंभप्रसंगी केले.
साने गुरुजी यांच्या कल्पनेतील आंतरभारती चळवळीच्या शाखेचा येथे शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माने बाेलत हाेते. उद्घाटन महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. राम माने यांनी साने गुरुजींचे कार्य सांगून त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आंतरभारतीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन केले.
प्रा. लता शिवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी समितीचे गठन करून समिती प्रमुख म्हणून प्रमिला पाटील यांची नेमणूक करण्यात आली. निबंधाचे परीक्षण, मूल्यमापन प्रा. साधना देशमुख, प्रल्हाद मिस्त्री आणि मंगला ठाकूर यांनी केले. आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाविजय आर्य यांनी व्हाॅट्सअॅपवर शुभेच्छा संदेश पाठवला. तो सचिन दुर्गाडे यांनी वाचून दाखवला. साने गुरुजींच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी आंतरभारतीच्या उपक्रमांचे आम्ही नाशिककर मनापासून आयोजन करू, अशी उपस्थितांनी ग्वाही दिली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर तळवलकर, मयूर बागूल, सचिन दुर्गाडे, पुष्पलता गायकवाड, प्रा. साधना देशमुख आदींसह मागील आंतरभारती बालमहोत्सवात सामील झालेले निर्मिती, साक्षी जाधव, साक्षी बोराडे हे विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमिला पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पंडित गायकवाड आणि साधना पेलमहाले यांनी केले तर आभार शोभामाई आरोटे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.