आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेविडचे रुग्ण वाढत असले तरी संमेलनाला ४० दिवस आहेत. त्यामुळे संमेलनावर त्याचा परिणाम हाेणार नाही या आशेने आपण काम करत राहू. संमेलनातील प्रत्येक मंडपातील प्रत्येक कार्यक्रमानंतर ताे मंडप सॅनिटाइझ केला जाईल. येणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य असून त्याशिवाय संमेलनात प्रवेशच दिला जाणार नसल्याची माहिती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनासंदर्भात फार्म हाऊस येथे भुजबळांनी रविवारी (दि. २१) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काेविडविषयक सर्व खबरदारी साहित्य संमेलनात घेतली जाणार आहे. महानगरपालिका, प्रशासन त्यासंदर्भात आपापल्या पातळीवर काम करत आहेत. संमेलनस्थळी दर दाेन तासांनी वा एक कार्यक्रम झाल्यानंतर जागा सॅनिटाइझ केली जाणार आहे. या ठिकाणी डाॅक्टर, अॅम्ब्युलन्स याचीही व्यवस्था करण्यात आली असून शहरातील काही रुग्णालयांमध्ये बेडचीही व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासह संमेलनाच्या इतर तयारीबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. मुख्य सभामंडपाची आसन क्षमता १५ हजार आहे. मात्र या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी आपल्याला ६००० खुर्च्याच ठेवाव्या लागणार असल्याची माहिती हेमंत टकले यांनी दिली. बैठकीला साहित्य महामंडळाचे पदाधिकारी हजर होते.
यायचं त्यांना येऊ द्या, आपण काळजी घेऊ
संमेलनाला येणाऱ्यांची काही सांख्यिक मर्यादा ठेवली आहे का? यावर भुजबळ म्हणाले की, संमेलन हा माेठा उत्सव आहे. त्यामुळे येणाऱ्यांना येऊ द्या. त्यांची काळजी आपण घेऊ. येथे कमी लाेक यावेत यासाठी आपण म्हणून काहीही प्रयत्न करणार नाही. येणाऱ्या प्रत्येकानेही काळजी घेणे गरजेचे आहे. अजून सव्वा महिना आहे. आम्ही काेविड परिस्थितीवर नजर ठेवून आहाेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.