आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेचे १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोघा रुग्णालयांमध्ये शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. यानंतर दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळण्यात येईल. यानिमित्त आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये स्वच्छता करण्यात येऊन वैद्यकीय स्टाफ तसेच रुग्णांच्या दृष्टीने आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती राखण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखली जावी व परिसर सुंदर व आरोग्यदायी राहावा यासाठी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सर्वांगीण स्वच्छता करण्यात यावी, असे आदेश आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरज कुमार यांनी दिले आहेत. प्रथम मोहीम शनिवारी (दि. ४ फेब्रुवारी) राबवण्यात येणार असून नंतर दरमहा प्रथम शनिवारी ''स्वच्छता दिवस'' पाळण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत, आरोग्य संस्थांमधील परिसर, आंतररुग्ण विभाग स्वच्छतागृहे, बालरुग्ण विभाग, आदींची स्वच्छता करण्यात यावी, र्निलेखनासाठीचे साहित्य वेगळया ठिकाणी लावावे , कॉरीडोर, वॉर्ड, ओटी, स्वच्छतागृह येथे कोणतीही अडगळीची वस्तू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी,अशा सूचना केल्या आहे.
आरोग्याकर्मी घेणार सहभाग महानगरपालिकेचे १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच दोन रुग्णालये यात वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, गटप्रवर्तक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी असा एकूण ३५० अधिकारी कर्मचाऱ्यांचा वर्ग कार्यान्वित आहे. सेवाकाळात असलेले आरोग्याकर्मी स्वच्छता अभियानात भाग घेतील. - डॉ.सपना ठाकरे, मुख्य आरोग्य अधिकारी,महापालिका. राज्यभर अभियान स्वच्छता दिवस हे अभियान दरमहा सुरू राहील. त्याच्या अहवालांचे सचित्र संकलन हे जिल्हास्तरावरून उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. या अभियानाचा नियमित आढावा उपसंचालक स्तरावर घेण्यात येणार असून, मासिक अहवाल आयुक्तालयास सादर केला जाईल. तसेच सर्व आरोग्य संस्था स्वच्छ राहतील, याची दक्षता घ्यावी व लोकसहभागतून आरोग्य सेवा सुंदर, स्वच्छ कराव्यात, असे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.