आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:महामंडळामध्ये ठालेंसारखी प्रवृत्ती असेपर्यंत दिल्लीत संमेलन अशक्य, ठालेंच्या लेखातील मुद्द्यांना संजय नहार यांचे पत्राद्वारे उत्तर

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तिगत अहंकार असणाऱ्या प्रवृत्ती महामंडळात असेपर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे. महामंडळाच्या अक्षरयात्रा या नियतकालिकाचा ठाले यांनी व्यक्तिगत वापर करून त्यातून कपाेलकल्पित आणि धादांत खाेटे आराेप केल्याचा आशय असलेले पत्र सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्याकडे पाठवले आहे. ठाले यांनी नियतकालिकातील लेखात दिल्लीतील संमेलनासाठी शरद पवारांचे नाव पुढे करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, संमेलन नाही मिळाले तर ‘मला पाहून घेणे फार काही अवघड नाही’ अशी साैम्य धमकी, संमेलनासाठीची न पटणारी कारणं आणि घुमानच्या संमेलनाप्रमाणे केवळ स्वार्थ आणि फायदे यासाठीच दिल्लीत नहारांना संमेलन हवे असल्याबद्दल अत्यंत परखडपणे लिहिले आहे. त्यावर आता नहारांनी या पत्राद्वारे वादाला पुन्हा ताेंड फाेडले आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अक्षरयात्रा या नियतकालिकातील लेखात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले-पाटील यांनी घुमानला झालेले ८८वे साहित्य संमेलन आणि नाशिकला संमेलन जाहीर हाेण्यादरम्यान दिल्लीत संमेलन व्हावे यासाठी सरहद संस्थेचे संजय नहार यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल तीव्र शब्दात लिहिले आहे. त्यावर अखेर नहार यांनी मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जाेशी यांना दिलेल्या या पत्रातून उत्तर दिले आहे.

नहार यांच्या पत्रातील आशय असा...
गेले दोन दिवस साहित्य क्षेत्रासह पत्रकार आणि दिल्लीतील मराठी बांधव तसेच महामंडळाशी संबंधित काही व्यक्तीही सरहद संस्था ९५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी अजूनही इच्छुक आहे का?, असे विचारत आहेत. मात्र, दिल्लीसाठीचा प्रस्ताव केवळ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर १ मे २०२१ रोजी साठीचा होता. नाशिकला संमेलन गेल्यानंतर संस्था भविष्यात कधीही अ. भा. मराठी. साहित्य संमेलनासाठी पुढाकार घेणार नसल्याचे लेखी कळवले होते.

ठाले पाटील यांनी ‘घुमान’ साहित्य संमेलनात भारत सासणे यांना संमेलनाध्यक्ष पदास मदत न केल्याच्या रागातून अक्षरयात्रा या महामंडळाच्या मुख्यपत्राचा व्यक्तिगत राग दाखवत वापर करून कपोलकल्पित व धादांत खोटे आरोप केले आहेत. यातील प्रत्येक शब्दाचा लवकरच खुलासा केला जाईल. भारत सासणे संमेलनाध्यक्ष असले तरच घुमान संमेलनाला मदत करू अशी ठाले पाटलांची भूमिका होती की नाही आणि त्याबाबत प्रकाशक राजीव बर्वे आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी त्यासाठी पुण्यात हॉटेल वैशालीमध्ये माझी भेट घेतली होती की नाही याचा खुलासा तेच करू शकतील. ठालेंनी ९५ वे संमेलन किंवा विशेष संमेलन दिल्लीत घ्यावे हा प्रस्ताव यावर्षी दिला होता की नाही याचाही खुलासा त्यांनी आणि मनोहर म्हैसाळकर यांनी करावा. दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र, कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तिगत अहंकार असणाऱ्या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे.

ठाले-पाटील लेखात म्हणाले...
महाराष्ट्राबाहेरच्या संमेलनाच्या नावाखाली प्रदेश पर्यटनाला हातभार लागताे. घुमानला शून्य मराठी माणूस असताना संमेलन उत्सव म्हणून साजरे केले. त्या संमेलनाने मराठी भाषेची किंवा संस्कृतीची तिथे काेणती रुजवणूक केली याचे उत्तर महामंहळाने स्वत:च्या आत डाेकावून गंभीरपणे देण्याची गरज मला वाटते. दाेन वर्षांपूर्वी दिल्लीकरांनी साहित्य संमेलन घेण्यास नकार दिला हाेता. दिल्लीत महाराष्ट्रदिनी संमेलन घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन साजरा करायचा हाेता. शरद पवारांना स्वागताध्यक्ष करून त्यांना माेठे करायचे हाेते. विविध राजकीय नेत्यांची नावे घेऊन ते मला फाेनवर नेहमी हेच सांगत हाेते. शरद पवारांच्या नावावर माझ्यावर आणि महामंडळावर दडपण यावे आणि आम्ही दिल्लीसाठी त्यांनी दिलेले निमंत्रण निमूटपणे स्वीकारावे असा प्रयत्न सुरू हाेता. दरम्यान, त्यावेळी ‘मला पहून घेणे फार काही अवघड नाही’ अशी साैम्यशी धमकीही दिली हाेती. असे दाेनदा साैम्यशा धमकीचे मला फाेन आले. दुसरे कारण म्हणजे पाानिपतच्या तिसऱ्या युद्धाची २६१ वर्षे. ज्या युद्धात आपला पराभव झाला त्या पराभवाचाही संमेलन घेऊन उत्सव करावा हे काही पटले नाही. विविध मार्गांनी दिल्लीत संमेलन व्हावे यासाठी माझ्यावर दडपण आणले हाेते. : काैतिकराव ठाले-पाटील. अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

बातम्या आणखी आहेत...