आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या आधीच उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. 50 पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत जात एकनाथ शिंदेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये यापूर्वीदेखील संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर ठाकरेंना धक्का बसला होता.
गेली अनेक दिवस नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही गळती थांबवत डॅमेज कंट्रोलसाठी राऊत यांचा मैदान तयार करण्यासाठी येत आहेत. नाशिकच्या संपर्क प्रमुखांसह, माजी आमदार, माजी 12 नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मागील 15 दिवसात पक्ष्याला जय महाराष्ट्र केला आहे. तर आज 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आहे. यातच शहरातील ठाकरे गटातील काही पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे संजय राऊत हे नाशिकमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यातून पुन्हा एकदा नाशिकच्या ठाकरे गटाला उर्जितावस्था मिळणार यात शंका नाही. नाशिकसाठी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. या महिन्याच्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असून ते जाहीर सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक महापालिकेचे बारा माजी नगरसेवक आणि त्यांची शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी , आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
राऊतांचे निकटवर्तीय शिंदे गटात
नाशिक महापालिकेचे बारा माजी नगरसेवक आणि त्यांची शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी , आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. संजय राऊत यांच्या मागील दौऱ्यानंतर नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. यामुळे आता संजय राऊत यांचा होणार दौरा महत्त्वाचा मानला जात आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.