आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांची स्पष्टोक्ती:मुख्यमंत्रीपदात कुठलीही वाटाघाटी होणार नाही, 5 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मराठा आरक्षणाबाबत आम्ही हात जोडून विनंती केली, आता पंतप्रधान नरेंद्र मोदीच निर्णय घेतली'

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध विषयांवर भाष्य केले.

यावेळी राऊत म्हणाले की, आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची वाटणी व्हायची. पण आता पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केले. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही काँग्रेसमध्ये नाराजी नाही,असे राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत मोदी निर्णय घेतील

राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील. विरोधकांनी महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा. 'मराठा आरक्षण मार्गी लावण्यात काढण्यात येणारा मोर्चा दिल्लीत काढायला हवा. आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील,' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत कुणाचीच नाही

राऊत पुढे म्हणाले की, आपण महाराष्ट्रातील राजकारणी आहोत. शत्रुत्व टोकाचं नसत, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. त्यांना सांगू इच्छतो की, वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत कुणाचीच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आगामी निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राची साथ गरजेची
राऊत पुढे म्हणाले, आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे, त्यानुसार काम सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रचे योगदान महत्वाचे आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. हळूहळू संघटनेचे काम चांगले होत आहे. अनुभवी लोकांची समिती स्थापन करू असेही राऊत म्हणाले.

फडणवीस त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात

राऊत पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहे. त्यांच्या विरोधात नवी आघाडी निर्माण केली तर बरोबरीची लढाई लढता येईल. पण, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही.

शरद पवार आणि प्रशांत किशोर भेटीचा वेगळा अर्थ काढू नये

प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटी झाल्यात. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थिती, निवडणुकांबाबत माहिती गोळा करून ती पक्षांना देणे हे त्यांचे काम आहे. कधीकाळी प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत होते. पंजाबमध्ये कॅप्टन अमेंद्ररसिंग, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम केले आहे. शिवसेनेसाठी सुद्धा त्यांनी काम केले आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार हे नेहमी वेगवेगळ्या लोकांकडून माहिती गोळा करत असता, असे राऊत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...