आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येड्यांची जत्रा:अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता म्हणत राउंतांनी राणेंवर साधला निशाणा, तर काही ठिकाणी 'येड्यांची जत्रा' म्हणूनही टोला

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद काही संपलेला नाही. संजय राउत यांनी नाशिकमध्ये असताना पुन्हा केंद्रीय मंत्री राणेंवर जहरी टीका केली. अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लावला. सोबतच, महाराष्ट्रात तीन मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या पण एक अतिशहाणा निघाला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचे पालन केले नाही असेही राउत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार आणि नेते संजय राउत यांनी नाशिकमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणेंचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री यांनी मुख्यमंत्र्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले त्यावरून एकूण 4 जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकीच एक नाशिक होते. यावर बोलताना राउत म्हणाले, मला असे वाटले नाशिकला जावे. शेवटी अख्या देशात 8 दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू आहे. तुम्ही FIR केला तेव्हा मी भुवणेश्ववरला होतो. तेथून परत आलो, असे शिवसेना खासदारांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांवरील विधानावरून नारायण राणे यांना अटक करून 5 तासांत सुटकाही करण्यात आली. या दरम्यान, भाजपची जनआशीर्वाद यात्रा दोन दिवस स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करण्यात आली. त्या यात्रेवर बोलताना संजय राउत म्हणाले, अनेक ठिकाणी (भाजपकडून) जनआशीर्वाद यात्रा काढली जात आहे. मात्र, काही ठिकाणी येड्यांची जत्रा निघाली असा प्रहारही राउत यांनी केला.

राणेंकडूनही हल्ला
तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. एकेक प्रकरण बाहेर काढणार असल्याचे राणे यावेळी म्हणाले. बाळासाहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितले गेले. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही.

पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असा खोचक टोला राणे यांनी लगावला. सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. त्याचे आरोपी सापडले नाहीत. नारायण राणेच्या मागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सत्तेच्या मस्तीतून कारवाई झाली -राणे
राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान ‘मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. जी घटना घडली ती कायदेशीर नव्हती. सत्तेच्या मस्तीतून ही कारवाई करण्यात आलेली आहे. माझ्या केसेस काढू म्हणता तर मला शाखाप्रमुख, मंत्री ते मुख्यमंत्री का केलात मग?’ असा प्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.

बातम्या आणखी आहेत...