आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्यात परवानगी मिळणारच कारण राज्यात त्यांचे सरकार आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृत असल्याने सभेला परवानगी मिळणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत नेमके म्हणाले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधून राज ठाकरेंसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्यात परवानगी मिळणारच कारण राज्यात त्यांचे सरकार आहे. ते भाजप पुरस्कृत असल्याचे म्हणत खासदार संजय राऊत यांनी आमच्या सभेला परवानगी मिळण्यास त्रास होतो असे म्हटले आहे. तर 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेल्यावरही शिवसेना अद्यापही जागेवर असल्याचा निर्वाळा यावेळी त्यांनी दिला.
शिवसेना भवन जिव्हाळ्याचा विषय
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना भवन हा सगळ्यासाठी प्रेमाचा आणि जिव्हाळयाचा विषय आहे, अनेकांचा जीव तिथे अडकला आहे, त्यामुळे कोणालाही शिवसेना भवनासमोर सभा घेण्यास बंदी नाही. राज ठाकरेंना सभा घ्यायची असेल तर घेऊ द्या सभा घ्यायला कोणाची बंदी आहे का? असे म्हणत याबाबत आम्ही काय सांगणार असे राऊतांनी म्हटले आहे.
राज्यपाल लवकरच जाणार
राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. राज्य घटना व संविधानानुसार सर्वाच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला तर 2024 च्या आधी परिवर्तन होणार. तर डॅमेज कंट्रोलसाठी आधी डॅमेज व्हावे लागते. काही लोक सोडून गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.