आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे गटातील 11 माजी नगरसेवक शिंदे गटात:ते लालची दलाल, आमचे सरकार आल्यावर पुन्हा दारात येतील - संजय राऊत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय करंजकरांनी गद्दार म्हणत डागली तोफ

शिवसेनेचे नाशिकचे 11 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश केला. काल खासदार संजय राऊतांसोबत एकत्र जेवले आणि आज शिंदे गटात गेले. यानंतर संजय राऊत यांनी तोफ डागली. ''जमिनीचे व्यवहार करणारे, लालची आणि कमी कुवतीचे लोक गेले. त्यांचा व्यवसायच मुळी दलाली करणे हा आहे. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा दारात येतील. असा टोला त्यांनी लगावला.

चार पदे देऊनही गद्दारी केली - करंजकर

दहा वर्षांपूर्वी भाजपमधून शिवसेनेत आयात झालेल्या अजय बोरस्ते यांना महानगरप्रमुख पद, पालिका गटनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीवर सदस्य तसेच विधानसभेची उमेदवारी अशा सर्वच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्यानंतरही त्यांनी गद्दारी केल्याची तोफ जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये डागली.

कचरा साफ, दलाल गेले

उद्धव ठाकरे शिवसेनेतील कचरा या निमित्ताने साफ झाला असून दलाल गेले, मात्र त्यांच्यासोबत काही निष्ठावंतही गेल्याची खंत असून ते पुन्हा पक्षामध्ये परततील असा विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला.

या वेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 11 नगरसेवक गेले असले तरी त्यातील बरेचसे आयात केलेले होते. लवटे सारखे दोन तीन निष्ठावंत मात्र गेले. शिवसेनेत कट्टर कार्यकर्त्यांची कमी नसून आतापर्यंत पक्ष सोडला त्यांचे काय हाल झाले ते सर्वश्रुत आहे. आता या दलालांना पाडण्यासाठी आम्ही शर्थ करणार असाही विश्वास व्यक्त केला.

राऊतांसोबत जेवण दुसऱ्या दिवशी बेईमानी

संजय राऊत यांच्यासमोर आदल्या दिवशी ज्यांनी जेवण केलं, भाकरी खाल्ली, त्यांनी मिठाशी गद्दारी केली. असा विश्वासघात करणार्‍यांपैकी एकही निवडून येणार नाही असाही दावा त्यांनी केला.

25 खोके ; सर्व ओके

या प्रवेशामागे मोठे अर्थकारण झाल्याबाबत विचारले असता करंजकर यांनी माध्यमातूनच मला 25 खोके दिल्याचे समजले असा दावा करत 25 खोके ; एकदम ओके असा प्रकार असल्याची टीका केली.

‘सिल्व्हर ओक’चे दलाल!

''राज्यात शिवसेना संपण्यास कारणीभूत असलेले आणि नाशिकमध्ये केवळ पर्यटनासाठी येणारे ‘सिल्व्हर ओक’चे दलाल कोण आहेत? हे सर्वांनाच माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा शब्द दिल्यानेच आम्ही प्रवेश केला.'' - अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता

''जमिनीचे व्यवहार करणारे, लालची आणि कमी कुवतीचे लोक गेले. त्यांचा व्यवसायच मुळी दलाली करणे हा आहे. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा दारात येतील. आम्ही त्यांना घेणार नाही.'' - संजय राऊत, खासदार

बातम्या आणखी आहेत...