आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेता सुषमा अंधारे यांना वारकरी संप्रदायाचे संबंधित केलेल्या वक्तव्यावरून टीका होत असताना खासदार संजय राऊत हे उघडपणे बचावासाठी उतरले असून त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालाविरोधामध्ये संबंधित व्यक्ती का बोलत नाही असा प्रश्न वारकरी संप्रदायातील नेत्यांना केला.
..नंतर प्रेत उकरा
संजय राऊत म्हणाले, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सुधांश त्रिवेदी, प्रसाद लाड आणि विद्यमान पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर आधी कारवाई करा मग भूतकाळामधील मडं उकरून काढा.
सुषमा अंधारेंनी मागितली माफी:आळंदीत वारकऱ्यांकडून प्रतीकात्मक अंत्ययात्रा!
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत वक्तव्याबद्दल माफी मागितली. तर दुसरीकडे आळंदीत संतप्त वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. येथे वाचा सविस्तर
शिवसेना वारकरी संप्रदायासोबत
नाशिक येथील पत्रकार परिषद मध्ये राऊत म्हणाले की, शिवसेना सातत्याने वारकरी संप्रदायासोबत राहिलेली आहे. कधीही वारकरी संप्रदायाचा अवमान केला नाही व करणारही नाही मात्र गेल्या काही वर्षापासून सातत्याने जे भाजपसोबत नाही. म्हणजे ते हिंदुत्ववादी नाही अशा पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, आमच्या विरोधामध्ये टारगेट करण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. स्वतः सुषमा अंधारे यांनी भूमिका मांडली आहे.
आमची भूमिका म्हणजे ढोंग नाही
संजय राऊत म्हणाले, साधुसंत महंत यांच्या विषयीची आमची भूमिका म्हणजे ढोंग नाही. आमची श्रद्धा आहे. अंधारे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेनेची भूमिका मांडत फिरत आहे, ढोंगीपणावरच्या पद्धतीने प्रहार करत आहे. ते बघता त्यांच्या मागच्या भूमिकांबाबत उगाच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्या शिवसेनेच्या परिवारामध्ये सहभागी झाल्या आहेत.
महामोर्चा निघेलच
संजय राऊत म्हणाले, राज्यपालांविरोधामध्ये आपण शेपूट घालून बसले आहात आणि अंधारे यांच्या विषयी जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचे छोटे राजकारण केले जात असल्याचाही आरोप केला. 17 मार्च रोजी महामोर्चा निघेलच व महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा असेल व त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी होऊ.
सर्वच धर्मांमध्ये जिहाद सुरू
संजय राऊत म्हणाले, लव जिहाद कायद्यासंदर्भामध्ये ते म्हणाले की सर्वच धर्मांमध्ये अशा पद्धतीचे जिहाद सुरू आहे. मात्र माझी भूमिका स्पष्ट असून कोणत्या धर्मामधील महिला मुलींवर अत्याचार होणे अयोग्य आहे.
तो जिहादच
संजय राऊत म्हणाले, निर्भया कायदा देशातील सर्वच महिलांबाबत असून निर्भया सुरक्षेसाठी पोलिसांना दिलेल्या गाड्या गद्दार 40 खोके बहाद्दर मंत्री, आमदार सुरक्षितेसाठी धावत आहे हा खरा जिहाद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यामागे भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटत असून अंधेरी पोटनिवडणुकीनंतर हे स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.