आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा अंत जवळ:बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नयेत, राऊतांचे आवाहन; फडणवीसांनी निकालाचे चुकीचे विश्लेषण केल्याचा दावा

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. या 16 आमदारांना घरी जावे लागणारच. न्यायालयाने यांना उघडे पाडले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला. तसेच दाबादाबी चालणार नाही, 90 दिवसांत निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा पाहा काय होईल, असा इशारा दिला.

राज्यभरात प्रचंड उत्सुकता असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत परखड शब्दांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे आढले आहेत. तसेच अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. संजय राऊत यांनी आज परखड भाषेत सरकारवर निशाणा साधला आहे.

पेढे वाटताय, नाचताय

संजय राऊत म्हणाले, मिंधे लोक पेढे वाटताय, फटाके वाजवताय. खासदार नाचत आहेत. आमच्याकडे असताना या खासदारांना कधी नाचताना पाहिले नाही. मात्र हे नागडे नाचत होते, सर्वोच्च न्यायलयाने यांचे कपडे उतरवले आहेत. नग्न करुन त्यांना विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले आहे.

उसणे अवसान...

संजय राऊत म्हणाले, भरत गोगावलेचा व्हिप बेकायदेशीर होता. इथेच सरकारचा पराभव झाला आहे. आता सामान्य माणसालाही कायदा कळतो. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नव्हे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर संपूर्ण सरकार अपात्र होईल. सर्वोच्च न्यायालयानेच यांना अपात्र ठरवले आहे. मात्र आता हे उसणे अवसान आणत आहेत आणि आतून रडत आहेत. सरकारचा अंत जवळ आलेला आहे.

नार्वेकर घटनात्मक पदावर

संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर मुलाखती देत आहेत की, हे माझ्याकडे येणार आहे मीच पाहिल. ते अशा मुलाखती देऊ शकत नाही. नार्वेकर घटनात्मक पदावर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक पक्ष बदललेले आहेत. त्यांना स्थैर्य नाही. नार्वेकरांना सर्वोच्च न्यायलयाच्या निवाड्यानुसारच न्याय करावा लागेल.

संजय राऊत म्हणाले, काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचे विश्लेषण केले. याला बेशरमपणा म्हणतात. हे थांबायला हवे. लोकशाहीचा डंका मिरवणारे पंतप्रधान जगाला काय तोंड दाखवणार?

संबंधित वृत्त

पोपट मेलेला आहे: राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकांना सामोरे जा, जनतेचा कौल स्विकारा; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना आव्हान

नैतिकतेला धरुन मी राजीनामा दिला. आता बेकायदेशीर सरकारने आपला राजीनामा द्यावा. आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाऊयात. जनता सर्वोच्च आहे. त्यांचा कौल स्विकारुया, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर