आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना सोडून गेलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांची पोरं हातावर मेरा बाप चोर हे लिहितील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.
शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार गेले, मात्र शिवसेना पक्ष तिथेच आहे. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका राज्य सरकार टाळते आहे, ते केवळ भीतीपोटी टाळत आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. निवणुकीला चिन्ह नवे असले मशाल असले तरी जनता शिवसेनच्या उमेदवारांनाच निवडून देणार आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केली आहे. लोकांमध्ये प्रंचड अशी चीड निर्माण झाली आहे, शिवसेनेला यामुळे कुठेही तडा गेला नाही. मात्र आता जे आमदार, खासदार शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे म्हणत शिंदे गटाला आव्हान दिले आहे. हा पालापाचोळा गेला असेही राऊतांनी म्हटले आहे. जनता शिंदे गटातील लोकांना गद्दार आणि खोके वाले म्हणते असे सांगताना संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मर्दासारखे फिरून दाखवा
काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे फुटलेल्या आमदारांना महालगावमध्ये केवळ चप्पल मारायचे ठेवले होते, असे म्हटले आहे. सुरक्षा जास्त दिली आहे, पण पुढे त्यांचे भविष्य नाही असेही राऊत म्हटले. तर सुरक्षा काढून मर्दासारखे फिरून दाखवा असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.
गद्दारांची पोरं मेरा बाप चोर हे गोंदतील
संजय राऊत म्हणाले की, माझी जी माहिती आहे,सुहास कांदे आणि भुसे यांच्यात ठिणग्या उडत आहेत. असे म्हणताना नारायण राणे यांच्यावर बोलायची गरज नाही त्यांनी महत्त्व देत नाही, असा टोला राणेंना लगावला आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे. दिवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर आहे, असे लिहले तसेच आता या आमदारांच्या डोक्यावर गद्दारींचा शिक्का बसला आहे. नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का नाही, केवळ शिवसेना नावामुळेंच ते निवडून आले, असे म्हणत नवा उमेदवार शिवसेनेचाच निवडून येणार असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने जलसमाधी घ्यावी
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडले त्या चुल्लू भर पाण्यात मुख्यमंत्र्यांनी डुबून मरावे, असा टोला ही संजय राऊत यांनी लगावला आहे. बाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री तुम्हाला डिवचताय, असे अतिक्रमण याआधी कधीही झाले नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज सरकारच्या तोंडावर थुंकताय, सरकारला आव्हान देताय, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? याच स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली आता शिवरायाचा अपमान होतोय तर तुम्ही शांत का, असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहेे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.