आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानेश्वरीतून मिळतो आनंद अन् समाधान:डॉ. गुट्टे महाराज, अमृतधाम येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा समारोप कार्यक्रम

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानेश्वरीतून आपल्याला कायम आनंद अन् समाधान मिळत असून, प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा. जग काय म्हणेल या पेक्षा आपण आपल्या सत्कर्माकडे लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळसीराम महाराज गुट्टे यांनी आज केले.

पंचवटीतील अमृतधाम येथील श्री वरद गणेश मंदिर येथे श्री सिध्दी विनायक मिशनतर्फे चार दिवसीय 726 व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनिल बागुल, नीलवसंत फाउंडेशनच्या अध्यक्ष प्राची पवार, सोमनाथ बोडके, उमेश तोत्रे, दिलीप अहिरे, प्राचार्य शिवाजी सानप,चंदू भामरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

गुट्टे महाराज म्हणाले की, देशभरात खूप साधू - संत आहेत, त्यात काही आर्थिक दृष्टया मोठेही असतात. परंतू आत्मज्ञानी संतच करतात जगाचे कल्याण करत असतात. तुम्ही मला दुःख द्या, मी तुम्हाला सुख अर्थात आनंद देतो असे सांगणारे पहिले संत होते. अनेकांनी त्यांना त्रास दिला, परंतु सर्वांचेच कायम त्यांनी हीत बघितले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानाचा उगम नाशिक मधुन झाला आहे.ती संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या रूपाने. त्यामुळे यावेळी त्यांनी विविध दाखले देत ज्ञानेश्वरीतील प्रसंग विशद केले.

22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता साधू, संत व मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी पूजन होईल. श्याम पिंपरकर, संजीव आहिरे यांनी सूत्रसंचलन केले. आली. यावेळी अनिल सांगळे, मंगेश फड , मुरलीधर अकोटकर, श्याम विसपुते, ए.पी. पाटील, दत्तात्रय आंबेकर, चोपदार नामदेव भोर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनतर्फे करण्यात आले आहेत.

योग शिबीराचाही आज समारोप

सोहळ्यात दररोज पहाटे 5.30 ते 7 या वेळेत योग शिबिर घेण्यात आले. आज या सोहळ्याबरोबरच शिबिराचाही समारोप होईल. योगशिक्षक रामनाथ गंभीरे , सुभाष वाणी, पाटोळे मार्ग दर्शन करत आहेत. दरवर्षी प्रमाने यंदाही या शिबिरास प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...