आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन वर्षांपासून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची जानेवारी महिन्यातील पौषवारी कोरोना महामारीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक वारकरी ,फडकरी, दिंडी चालक ,मालक या वारीच्या सोहळ्यापासून वंचित राहिले. दरम्यान, आता नव्या उत्साहाने संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ दादांची येणारी पौषवारी ( निवृत्तिनाथ यात्रोत्सव) १८ जानेवारीपासून रुरू होत आहे.
या वारीच्या अर्थात यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानच्या वतीने महाराष्ट्रभरातून त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या दिंडी प्रमुखांची एकत्रित आढावा बैठक आज संत निवृत्तिनाथांच्या समोरील ह.भ.प.मुकुंद महाराज मठात पार पडली. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक तालुक्यातुन मागील अनेक वर्षांपासून परंपरागत दिंडी चालक या बैठकीला उत्स्फूर्तपणे उपस्थित झाले होते. निवृत्तिनाथांच्या मंदिराचे काम प्रसाद योजनेअंतर्गत सुरू आहे. वारकरी मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरला येणार असल्याने यावेळी राहण्याची व्यवस्था करावी अशी केली.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना देखील विश्वासात घेऊन वारकरी बांधवांची गैरसोय होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष घालणार असल्याचे एकमुखाने ठरविण्यात आले. मंदिर परिसरात महिला वारकरी भगिनीसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची योजना मोठया प्रमाणात करण्याचा मानस यावेळी संस्थानचा आहे. निवृत्तिनाथ संस्थानच्या विश्वस्त कांचन जगताप यांनीही महिलांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही अशी ग्वाही उपस्थित वारकरी व दिंडी प्रमुखांना दिली.
विविध दिंड्यांचे सुमारे 200 दिंडी प्रमुख प्रातिनिधिक माधवदास महाराज राठी यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातुन वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
निवृत्तिनाथ संस्थानचे पालखी सोहळ्याचे मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे यांनी सर्व मानकरी दिंडी प्रमुखांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. आजवर आम्हा दिंडी चालकांना असे कुणीही आमंत्रित केले नव्हते, ही पहिलीच बैठक असल्याने निश्चितच आनंद झाला आहे. सूचना विश्वस्त मंडळाने ऐकून घेतल्य. अध्यक्ष निलेश गाढवे यांनी मूलभूत सेवा सुविधापासून वंचित राहणार नाही याचे ठाम आश्वासन दिले. यापुढे संस्थानच्या प्रत्येक कार्यक्रमात वारकरी व दिंडी प्रमुखांना विश्वासात घेऊनच नियोजन केले जाईल असे आश्वासन दिले. सचिव ॲड.सोमनाथ घोटेकर अमर ठोंबरे, विश्वस्त नारायण मुठाळ, राहुल साळुंखे, नवनाथ गांगुर्डे, श्रीपाद कुलकर्णी, योगेश गोसावी, बाळासाहेब पाचोरकर, किरण चौधरी, कैलास आडसरे, एन. डी. गंगापुत्र. आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.