आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सप्तशृंगगड; श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचा महाप्रसाद सुरक्षित

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन शक्तिपीठात समावेश असलेल्या श्री सप्तशंृगगड आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ या दाेन्ही धार्मिकस्थळांवर भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद हा सुरक्षित आणि पौष्टिक आहे, अशी माेहाेर अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने लावली आहे. हायजिन आॅफरिंग टू गाॅड - ‘भाेग’ या अंतर्गत महाप्रसाद प्रमाणित करण्यात आला आहे.

असेे प्रमाणपत्र मिळविणारे देशातील केवळ ३०० तर महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर, इस्काॅन मंदिर, नांदेडचा गुरुद्वारा अन् अक्कलकाेटचे स्वामी समर्थ मंदिर अशा माेजक्यात धार्मिकस्थळांचा समावेश आहे. धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या ‘इट राइट इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उत्कृष्ट ७५ जिल्ह्यांमध्ये स्थान
धार्मिक स्थळांसाठीच्या ‘भाेग’ उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याला देशातील अन्नसुरक्षेमध्ये उत्कृष्ट ७५ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळाले आहे.- गणेश परळीकर, सहआयुक्त, नाशिक विभाग, अन्न व औषध प्रशासन

‘भाेग’मुळे सुरक्षित, पाैष्टिकतेची खात्री
अन्न व औषध प्रशासनाकडून धार्मिकस्थळांची यासाठी निवड हाेते. या स्थळांना अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना मिळवण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके प्राधिकृत त्रयस्थ संस्थेमार्फत अन्नसुरक्षा परीक्षण हाेते, परीक्षण यशस्वी झाल्यानंतर राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्तांकडून भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांना प्रमाणिकरणासाठी शिफारस केली जाते. यानंतर प्राधिकरण प्रस्तावाची तपासणी होऊन दाेन वर्षांसाठी प्रमाणपत्र प्रदान करते.

यांच्या प्रयत्नांना लाभले यश
सप्तशंृगगड प्रसादालय व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सुपरवायझर प्रशांत निकम, श्री स्वामी समर्थ गुरुपीठ प्रसादालय व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील व मनोज मुरादे यांचे यासाठीचे परिश्रम महत्त्वाचे ठरले. अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख व गोपाल कासार यांनी प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केली.

बातम्या आणखी आहेत...