आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्या संघाचे अभिनंदन:सारडा कन्या शाळा हॉकीमध्ये उपविजेती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयाेजित हाॅकी स्पर्धेत मा. रा. सारडा कन्या शाळेने उपविजेतेपद पटकावले.नाशिकराेडला के. एम. केला हायस्कूल येथे स्पर्धा पार पडली. सारडा कन्या शाळेच्या संघातश्रावणी मल्हार कातकाडे, हर्षदा पुंडलिक भदाणे, प्रांजल मनोज पगार, रिना सोमनाथ अचारी, वैष्णवी राहुल पवार, माही दीपक चक्रवर्ती, सिद्धी अजय गोरे, वर्षा संजय कोळी, जान्हवी गणेश दिंडे, हीना मोईनोद्दीन शेख, अनुष्का गणेश राजपूत, वैदेही योगेश धाराणकर, साक्षी विशाल नगरकर आदी विद्यार्थिनी सहभागी होत्या.

त्यांना प्रशिक्षक चित्रा उदार, क्रीडा शिक्षक, सुनीता कासार विलास बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर, मुख्याध्यापिका प्रियंका निकम, उपमुख्याध्यापक राजेंद्र कापसे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...