आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय जैन संघटना:‘केटीएचएम’ काॅलेज युवक महोत्सवात सरस ; 9 कलाप्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातील ६५ विद्यार्थ्यांनी १३ कलाप्रकारांमध्ये सहभाग नोंदवत सादरीकरण केले. यातील सर्वाधिक नऊ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोकृष्ट प्रदर्शन करत विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या सर्वसाधारण (जनरल चॅम्पियनशिप) विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिकसह पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक या चार विभागांमधून एकूण ३७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...