आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार:14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतील भ्रष्टाचारप्रकरणी सरपंच शीतल नंदन यांना अटक

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताहाराबादमधील विकासकामांसाठी १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील भ्रष्टाचारप्रकरणी सरपंच शीतल नंदन यांना मंळगवारी सकाळी जायखेडा पोलिसांनी अटक केली. दुपारी सटाणा सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जायखेडा पोलिस ठाण्यात गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी निधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सरपंच शीतल योगेश नंदन, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके, पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. शाखा अभियंता विनोद पाटकर याला जामीन मंजूर झाला होता. १६ ऑगस्टला ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके याला अटक झाली होती. परंतु, सरपंच नंदन चार महिन्यांपासून फरार होत्या. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली हाेती. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांनी मंगळवारी जायखेडा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

बातम्या आणखी आहेत...