आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रकला किंवा व्यंगचित्र असो वा एकूणच कलाक्षेत्राचं पूर्वीचं स्वरूप आणि आताचं स्वरूप यातील जे काही परिवर्तन झालं आहे ते अत्यंत समाधान देणारं आहे. पूर्वी फार काही अर्थार्जन मिळत नसे, तसा पाठिंबाहीं फारसा मिळत नसे. मात्र आता अनेक माध्यमं हाताशी आली. कलाकार त्याचा वापरही चांगला करत असल्याने कलाक्षेत्रात चांगले बदल होत असल्याने समाधान वाटते असा संवाद ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी साधला.
कुसुमाग्रज स्मारकात साेमवारी (दि. २०) जनस्थानच्या चित्र, शिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी तेबोलत होते. विनायक रानडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी साेनार यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून कलाक्षेत्र मांडले. एखादा कलाकार त्याच कलाक्षेत्राशी निगडीत असताे. मात्र इथे सर्व कलाकार एकत्र येतात ही अत्यंत चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. तसेच कलाकारांनी वाचन केले पाहिजे. विविध कलांचाही आस्वाद घेताना त्यातही रस घ्यायला हवा असेही ते म्हणाले.
नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांपासून, दादासाहेब फाळके ते आता आताचे अनेक कलाकार आले, काही नव्याने तयार झाले आणि नाशिक नगरीचे नाव रोषन केले. त्यामुळे असे उपक्रम सुरूच ठेवायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. यावेळी ग्रुपचे अभय ओझरकर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या प्रदर्शनात अनिल माळी, अतुल भालेराव, सी. एल. कुलकर्णी, केशव कासार, धनंजय गोवर्धने, प्रफुल्ल सावंत, राजा पाटेकर, राजेश सावंत, शीतल सोनवणे, स्नेहल एकबोटे, संदीप लोढे, श्रेयस गर्गे, शाम लोढे, यतीन पंडित यांचे चित्र-शिल्प ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन मंगळवारी (दि. २१) रात्री ८ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.