आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला डाकघर:सातपूर टपाल कार्यालय महिला डाकघर म्हणून घोषित

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय डाक विभागामार्फत टपाल विभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान तथा परिसंवादाच्या आयोजनाबरोबरच सातपूरच्या टपाल कार्यालयाला महिला डाकघर म्हणून घोषित करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने नितीनभाऊ मोरे, टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव, पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, नवी मुंबईच्या निर्देशक श्रीमती सारन्या यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा सन्मान आणि सातपूर टाऊनशिप पोस्ट ऑफिस - ४२२००७ची महिला डाकघर म्हणून घोषणाही करण्यात आली. या कार्यक्रमास अधीक्षक डी. बी. वसदानी, सेवानिवृत्त अधीक्षक एम. आर. जटाळे उपस्थित होते.

यावेळी नितीनभाऊ मोरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, सेवामार्गात प्रत्येक उपक्रमात महिलांचा सन्मान करण्यात येतो. महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपनाविषयी माहिती दिली.यावेळी टपाल विभागातील अधिकारी विशाल निकम, संदीप पाटील, मनोज रुळे, मनीष देवरे, तक्रार निरीक्षक, वरिष्ठ अधीक्षक रामसिंग परदेशी, लेखापाल हितेश बारी, अमितेश कुमार, शरद पवार, देव, पुष्पेंद्र तसेच नाशिक प्रधान डाकघर आणि विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन डॉ. संदेश बैरागी यांनी केले. विठ्ठल पोटे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...