आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:सातपूर समस्याग्रस्त, भाजपची तक्रार

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूरचे विभागीय अधिकारी कार्यालयात थांबत नाहीत. त्यामुळे या विभागात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. प्रशासकीय काळात सातपूर विभागात अंदाधुंद कारभार सुरू असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठवडाभरात समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.

महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. १) प्रशासक रमेश पवार यांची भेट घेतली. अनेक प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करून आयुक्तांकडे विभागीय अधिकाऱ्यांची तक्रार केली. सातपूर भाजप मंडल अध्यक्ष भगवान काकड, माधुरी बोलकर, डॉ. वर्षा भालेराव, रामहरी संभेराव, भाजयुमोचे अमोल पाटील, माजी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, गणेश बोलकर, ॲड. महेंद्र शिंदे, हेमंत नागरे, नीलेश सोनार, दशरथ लोखंडे, दत्तू पाटील, दत्तू डंबाळे, गौरव बोडके, विशाल साळवे, रवींद्र जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...