आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यजित तांबे यांचे लेकीकडून कौतुक:अहिल्या म्हणाली - बाबांचा खूप अभिमान वाटतो, तेच माझे 'रिअल' सुपरहिरो

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. अतिशय चुरशीच्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या विजयाचे लेकीने तोंडभरुन कौतुक करत मला माझ्या बाबांचा खूप अभिमान वाटतो. तेच माझे सुपरहिरो आहेत अशी प्रतिक्रिया अहिल्या हिने दिली.

गेल्या महिन्याभरापासून नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात निवडणुकीवरुन सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र वेळेवर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

आई व बायकोकडून औक्षण

सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर 68 हजार 999 मते मिळवली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतांवर समाधान मानावे लागले. दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यांच्या या विजयानंतर घरी पोहोचताच आई व बायकोकडून औक्षण करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

माझे बाबा हार्डवर्क करतात

प्रत्येक लेकीला आपल्या वडिलांचा अभिमान असतोच. बाबा हा मुलीसाठी हिरो असतो. बाप-लेकीच्या नात्याची नाळ ही घट्ट जोडलेली असते. आपल्या वडिलांच्या विजयानंतर सत्यजीत तांबे यांची मुलगी अहिल्या तांबे हिने देखील आपला आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, मी खूप खुश आहे. माझ्या बाबांचा मला अभिमान वाटतो. ते खूप चांगले काम करतात. माझे बाबा खूप हार्डवर्क करतात. आणि तेच माझ्यासाठी सुपरहिरो असल्याचे तिने यावेळी म्हटले.

उद्या भूमिका स्पष्ट करणार

विजयानंतर सत्यजित तांबे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. आमच्याकडे देण्यासाठी एकच गोष्ट आहे ते म्हणजे प्रेम, मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिले. त्यामुळे 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.

संबंधित वृत्त

विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया

सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. आमच्याकडे देण्यासाठी एकच गोष्ट आहे ते म्हणजे प्रेम, मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिले. त्यामुळे 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...