आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीने रिअल इस्टेट कंपनी बनू नये:आमदार सत्यजीत तांबे यांनी सुनावले खडेबोल

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीने रिअल इस्टेट कंपनी न बनता उद्योजकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे खडेबोल तांबे यांनी एमआयडीसीला सुनावले. नाशिकसह विभागातील उद्योजकांचे प्रश्न सोविण्यासाठी आपण सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करू,असे उद्गार नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी काढले.

आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी प्रथमच निमा कार्यालयास भेट दिली त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे सचिव राजेंद्र अहिरे,आयमा सरचिटणीस ललित बूब, निमा उप समितीचेअरमन व एबीबीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आदी होते. नाशिक जिल्हा तसेच विभागात मोठ्याप्रमाणात असलेल्या व्यावसायिक महाविद्यालयाततून हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात.या सर्वांना आपण नोकऱ्या देण्याकरता काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा उद्योजकांनी गांभीर्याने विचार करावा, इगतपुरी तील गोंदेफाटा ते नाशिक आणि पुढे चारही बाजूने होत असलेला विस्तारामुळे नाशिक हे राज्यातीलच नव्हे तर देशातील उद्योगाचे मोठे केंद्र बनत आहे. आता खऱ्या अर्थाने या पट्टयात मोठे उद्योग येण्याची गरज आहे.

याप्रसंगी त्यांनी निमा अध्यक्ष म्हणून आपण पुढाकार घेऊन नाशिक विभागातील निवडक उद्योजकांची संयुक्त बैठक बोलावून त्यात विभागाच्या औद्योगिक विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट बनवा अशी सूचना श्रीयुत बेळे यांना केली,दुहेरी फायरसेससह, वीजदर, मूलभूत सेवा सुविधा, जागांचे संपादन करणे आदी उद्योजकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दरबारात नक्कीच वकिली करू,असेही तांबे यांनी पुढे नमूद केले.

सत्यजीत तांबे यांनी प्रस्तावित वीज दरवाढ लागू होऊ नये यासाठी शासन दरबारी आवाज उठवावा, नाशिक विभागात नवीन गुंतवणूक येण्याकरता शासन दरबारी आमचे मागणे मांडावे व नाशिक विभागातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्या करिता योग्य ते प्रयत्न करावे,दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करावी,एमआयडीसीचा अनागोंदी कारभार थांबवावा आदी मागण्या निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्ताविक पर भाषणामध्ये केल्या. कार्यक्रमास आयमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, निमाचे गोविंद झा, मनीष रावल मिलिंद राजपूत, संजय राठी,सुधाकर देशमुख, कैलास पाटील, राजेंद्र वडनेरे,योगिता आहेर,राहुल गांगुर्डे, हर्षद बेळे,जयंत पगार,श्रीकांत पाटील आदींसह उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...