आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातील 65 विद्यार्थ्यांनी 12 कलाप्रकारांमध्ये सहभाग नोंदवत सादरीकरण केले. यातील सर्वाधिक 9 कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोकृष्ट प्रदर्शन करत विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या सर्वसाधारण (जनरल चॅम्पियनशीप) विजेतेपदावर आपले नाव कोरले.
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिकसह पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक या चार विभागांमधून एकूण 37 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. जिल्हास्तरीय स्वररंग स्पर्धेतील निवडलेल्या संघांना सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील एकूण 65 विद्यार्थ्यांनी 13 कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. यात 9 कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करून विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाची जनरल चॅम्पियनशीप पटकावली. आजपर्यंत झालेल्या केंद्रीय युवक महोत्सवात नाशिक विभागाला आणि महाविद्यालयाला मिळालेली ही पहिलीच जनरल चॅम्पियनशीप आहे. यावेळी संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य पी. व्ही. रसाळ उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ. तुषार पाटील तसेच प्रा. वैशाली क्षीरसागर, प्रा. छाया लबडे, प्रा. प्रीतम नाकील, प्रा. तेजस बीलदिकर, प्रा. सूरज बोढाई यांनी संघ व्यवस्थापन केले.
केंद्रीय युवक महोत्सवातील केटीएचएमचे विजेते
कलाप्रकार- विद्यार्थ्याचे नाव- क्रमांक
वैयक्तिक सुगम गीत (पुरुष)- ऋषीकेश रिकामे- प्रथम
उपशास्त्रीय गायन- ऋषीकेश रिकामे- प्रथम
पाश्चिमात्य वैयक्तिक गीत- प्रियांशु मगर- प्रथम
पाश्चिमात्य समूहगीत- संगीत विभाग (केटीएचएम)- प्रथम
वैयक्तिक नृत्य स्त्री- अक्षता देशमुख- द्वितीय
शास्त्रीय नृत्य- पियुषा हिंगमिरे- द्वितीय
एकपात्री अभिनय स्त्री- मेघाली वैष्णव- प्रथम
एकांकिका- नाट्यशास्त्र विभाग (केटीएचएम)- द्वितीय
कात्रणकला / चिकटकला- रुचिका कोठावदे- प्रथम
सर्वोत्कृष्ट सांघिक पारितोषिक- युवक महोत्सव सर्वसाधारण विजेते महाविद्यालय- केटीएचएम महाविद्यालय, नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.