आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी विकासासाठी प्रयत्न:सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संशोधन, रोजगारवाढीसाठी 150 सामंजस्य करार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून शैक्षणिक दर्जा उंचावण्याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. मागील तीन वर्षांत विद्यापीठाने १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित संस्थांसोबात सामंजस्य करार केले आहे. त्यातून संशोधनासह रोजगार आणि करिअर ओरिएंटेड अभ्यासक्रमांवर अधिक भर देण्यात आल्याचा लेखाजोखा नुकत्याच झालेल्या कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी मांडला.

नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमिक क्रेडिट बँक, द्विलक्षी अभ्यासक्रम, क्रेडिट बेस चॉइस सिस्टिम, संशोधन आदींबाबत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. रोजगाराभिमुख शिक्षण, उद्योगांशी समन्वय, संशोधन आणि संशोधनातून तंत्रज्ञान विकास यासाठी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयपातळीवरील संस्थांशी विद्यापीठाने करार केले आहेत. त्यातून शैक्षणिक बाबींची दर देवाण-घेवाण केली जातेच. शिवाय कुठल्याही एका विषयावर संशोधन सुरू असल्यास त्याच विषयाशी संबंधित करार झालेल्या संस्थांमधील इतर विद्यार्थी प्राध्यापकांसोबतच हे संशोधन करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दर्जेदार संशोधनासह अगदी मनुष्य जीवनाला सुखकर करणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जात आहे. दुसऱ्या बाजूने विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती बळावण्यासह मदत हाेईल.

राष्ट्रीयपातळीवरील इस्त्रोसह महत्त्वाच्या संस्था राष्ट्रीय पातळीवर देखील इस्रो, मारुती सुझुकी, चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट, आयबीएम इनोव्हेशन सेंटर, आयुष इन्स्टिट्युशन, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, सिरम इन्स्टिट्यूट, एएफएमसी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेट्राॅनिक टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आदी महत्त्वाच्या संस्थांसोबत करार झाले आहेत.

विदेशातील संस्थांसोबत करार आंतरराष्ट्रीय करारामध्ये विद्यापीठाने हार्वर्ड बिझनेस स्कूल, मेलबर्न युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ केलिफॉर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे सिटी कॉलेज, जपान, ऑस्ट्रिया, पॅरिस, फ्रान्स, ग्रीस, जर्मनी, नॉर्वे, लंडन, यूएसए, पोलंड आदी देशात असणाऱ्या विद्यापीठ आणि तेथील नामांकित शैक्षणिक संस्थांशी करार केले आहेत.

स्थानिकपातळीवर करारबद्ध संस्था स्थानिक पातळीवर देखील राजा दिनकर केळकर संग्रहालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, संचेती हेल्थ केअर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन आदींसह अनेक संस्थांचा समावेश आहे. करार झाल्याने विद्यार्थीवर्गात समाधान व्यक्त हाेत आहे. अधिक करून शैक्षणिक विकास हाेण्यास विद्यार्थ्यांना हाेईल.

बातम्या आणखी आहेत...