आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजुकाया महाविद्यालयात अभिवादन:सावित्रीबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणासाठीचे कार्य प्रेरणादायी

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. अशोक सोनवणे यांनी केले.देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात मंगळवारी (दि. ३) सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक सोनवणे बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य सोपान एरंडे, उपप्राचार्य डी. टी. जाधव, उपप्राचार्य एन. के. सोनवणे, सुधाकर जाधव, डॉ. स्वाती सिंग आदी. होते.

प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणातून समाजविचारांची व राष्ट्राची बांधणी केली. हे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे म्हटले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डी. टी. जाधव यांनी केले. एस. जी. कापडी यांनी आभार मानले. याप्रसंगी वैशाली कोकाटे, लता सोमासे, श्याम जाधव, सुधाकर पवार, रमेश निकम, सुधाकर पवार, मानसी पवार आदी उपस्थित होते.

भगूर येथील मविप्रच्या अभिनव बालविकास मंदिरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी केले. शिक्षक चारोस्कर यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. अनेक विद्यार्थीनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत शाळेत उपस्थित होते. चाैथीच्या मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी सर्व मुलींना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन गौरव परदेशी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...