आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्थ निवड:राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी तनिशा कोटेचा, सायली वाणी, कुशल चोपडा महाराष्ट्र संघात

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ येथे होणा-या ८३ व्या जूनियर व यूथ राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी व कुशल चोपडा यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

पहिला पुरुष खेळाडू

कुशल चोपडा यांची १५, १७ व १९ वर्षाखालील वयोगटातील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. एका सिझनमध्ये तीन संघात निवड झालेला नाशिकचा पहिला पुरुष खेळाडू आहे. कुशल चोपडा हा १५, १७ व १९ वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्रात अनुक्रमे प्रथम, दुसरा व चौथा मानांकित खेळाडू आहे, तर राष्ट्रीय स्तरावर त्याला १५ वर्षांखालील गटात तिसरे मानांकन आहे. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर कुशलला १७६ वे मानांकन आहे.

राज्यात दुसऱ्या स्थानी

तनिशा कोटेचा व सायली वाणी यांची यावर्षी महाराष्ट्राच्या १७, १९ व महिला गटाच्या संघात निवड झाली. एका सिझनमधे तीन तीन संघाचे प्रतिनिधित्व करणा-या त्या दोघी नाशिकच्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. तनिशा ही सध्या राज्यात १७ व १९ वयोगटात अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर असून, तर राष्ट्रीय स्तरावर चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. सध्या ती जागतिक क्रमवारीत अनुक्रमे त्रेचाळीस व सत्याहत्तर स्थानावर आहे.

अनेक स्पर्धांत यश

सायली वाणी हिला १७ व १९ वयोगटात महाराष्ट्रात अनुक्रमे तिसरे व दुसरे मानांकन असून, राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे बत्तीस व चोवीसावे मानांकन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायलीला अनुक्रमे श्याहशी व एकशे एकोणचाळीस हे मानांकन आहे. तनिशा कोटेचा हिने नुकत्याच दोहा, ऑस्ट्रीया, जर्मनी व स्पेन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी युथ कंडेंडर स्पर्धेत भाग घेतला होता. सायली वाणी हीने २०२१ मधे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षाखालील वयोगटात अजिंक्यपद मिळविले होते. तसेच सायलीने युथ जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करून ब्रॉझ पदक पटकावले होते.

बातम्या आणखी आहेत...