आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:चौकार की षटकार सांगणे पायी जाणाऱ्याला पडले महागात, दोन भावांनी केली मारहाण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकची घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

रस्त्याने जात असताना क्रिकेट खेळणाऱ्या युवकाने मारलेला चेंडू चौकार की षटकार आहे, असे विचारले असता चौकार असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने दोन भावंडांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना शरणपूर रोडवरील एका शाळेजवळ सोमवारी उघडकीस आली.या प्रकरणी दीपक कुऱ्हाडे, प्रणव कुऱ्हाडे या भावांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि जॉर्ज साळवे (रा. शरणपूर रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शरणपूर रोडवरील रचना हायस्कूल जवळील मैदानाजवळून साळवे जात होते. या वेळी काही जण क्रिकेट खेळत होते. या वेळी संशयित दीपक कुऱ्हाडे याने जोरदार फटका मारून चेंडू उंच टोलावला. गोलंदाजी करणाऱ्या तरुणाने टोलावलेला चेंडू हा चौकार की षटकार, असे साळवेे यांना विचारले. त्यावर साळवे यांनी हा चौकार आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने दोघा भावांनी साळवे यांना बेदम मारहाण केली. दुसऱ्या तरुणांनी मध्यस्थी करत भांडणे सोडवली. त्यानंतर साळवे यांनी तक्रार दिल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी हे प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...