आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक दातृत्व:पॉलिटेक्निक विषयाच्या 30 विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मंडळ व ब्ल्यू क्रॉसतर्फे शिष्यवृत्ती

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन लाख 25 हजारांची मदत

ब्ल्यू क्रॉस लॅबोरेटरीजतर्फे दरवर्षी गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना शासनाची व इतर शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशा विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता व आर्थिक परिस्थिती या निकषावर निवड केली जाते. यंदा मविप्र संचालित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण ३० विद्यार्थ्यांना दाेन लाख २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्तीची रक्कम वाटप करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थिनी नीता वलवे, तनुजा डेर्ले, पार्थ पाटील, निशा वलवे, रुपाली सोनवणे, संस्कृती सूर्यवंशी, वरद बुऱ्हाडे, केतन चव्हाण, रिया वाजे, वरद विसपुते, गाैरव पवार, योगिता कवडे, ऋषिकेश सोनवणे, करिष्मा म्हस्के, ओम दळवी अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. तंत्रशिक्षण मंडळातर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये यावर्षी औरंगाबाद विभागातून मविप्र राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमधील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. हर्षली भामरे, सोहम जाधव, अथर्व विभांडिक, किशन पांडे, श्रीहरी मोगल, ओम नाठे, दुर्वेश भुसे, श्रीराम खांडबहाले, आदित्य म्हैसधुणे, जय धाकड, जान्हवी पाटील, पीयूष शेवाळे, विघ्नेश सोनवणे, गाैरव गवांदे, दर्शन अहिरे या १५ विद्यार्थ्यांना एक लाख ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. एस. जे. कोकाटे, प्राचार्य डॉ. डी. बी. उफाडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...