आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई येथील “हेल्प द ब्लाइंड’ या संस्थेकडून केटीएचएम महाविद्यालयातील ३५ अंध विद्यार्थ्यांना साडेतीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शुक्रवारी (दि. १०) महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी हेल्प द ब्लाइंड संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक व्ही. डी. सावकार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, दत्तात्रय कडवे, प्रा. सोपान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हेल्प द ब्लाइंड संस्थेतर्फे दरवर्षी अशाप्रकारची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहून पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले की, हेल्प द ब्लाइंड संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून पाठबळ देत असते. महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील या मदतीचे भान ठेवून विविध क्षेत्रांत आपले व महाविद्यालयाचे नाव उंचावेल अशी कामगिरी सातत्यपूर्णपणे करत असतात. व्ही. डी. सावकार यांनी यावेळी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे अंध विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षण देऊन चांगल्या संधी प्राप्त करून द्याव्यात, या उद्देशातून “हेल्प द ब्लाइंड’ संस्थेच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी मदत केली जाते. संस्थेच्या विविध योजना व कामांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.