आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन:दिव्यांगांना शिष्यवृत्ती; 30 नाेव्हेंबरपर्यंत संधी

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या दिव्यांग सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व, परीक्षोत्तर व उच्च श्रेणी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू असून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शाळा व महाविद्यालयांनी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.scholorship.gov.in या संकतेस्थळावर सादर करावयाचे आहेत. अर्ज पडताळणीची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...