आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये शालेय मुलीची छेड:नागरिकांकडून टवाळखोराला चोप; मुलीने रुद्रावतार दाखवत केली काठीने मारहाण

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय मुलीची भररस्त्यात छेड काढल्याच्या संशयातून नागरीकांनी मद्यपी युवकाला भररस्त्यात चोप दिल्याने परिसरातील टवाळखोरांवर नागरीकांनी जरब निर्माण केला. शनिवार दि.19 रोजी पाथर्डी फाटा परिसरातील एका शाळेच्या परिसरात हा प्रकार घडला. शालेय मुलीनेही रुद्र आवतार घेत युवकाला काठीने चोप देत आपला संताप व्यक्त केला.

शालेय मुलींची छेडछाड काढण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. शाळांच्या परिसरात टवाळखोरांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. टवाळखोरांकडून शालेय मुलींना लक्ष करत त्यांची छेडछाड काढतात. काही मुली पालकांकडे आणि शाळेत तक्रार करतात मात्र काही मुली हा सर्व प्रकार भीतीपोटी सहन करतात. पाथर्डी फाटा परिसरात अशीच एक घटनेत मुलीने प्रसंगवधान राखत मद्यपी युवकाला चोप दिला. एका शाळेच्या परिसरातून मुलगी घरी येण्यास निघाली असता रस्त्यावरुन जाणाऱ्या मद्यपी युवकाने मुलीकडे बघून अश्लिल हावभाव केले.

मुलीच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. मुलीने रस्ता बदलला मात्र संशयित पुन्हा मुलीकडे येत असल्याने मुलीने आराडाओरड केली.मुलीचा आवाज एकून परिसरातील नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला. मुलीला नागरीकांनी विचारपुस केली असता संशयित युवका छेड काढत असल्याचे सांगीतले. नागरीकांना याचा संताप आल्याने युवकाला पकडून चांगलाच चोप दिला. रोजच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीनेही झाडाची फांदी तोडून युवकाला मारहाण केली.मुलीचा रुद्र आवतार बघून नागरीकांनी मुलीला हिम्मत दिली. अशाच प्रकारे मुलींनी भीती न बाळगता प्रतिकार केला तर टवाळखोरांवर जरब बसले अशा प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्या.

शाळेच्या परिसरात गस्त वाढवावी

शाळेच्या परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पोलिसांची गस्त सुरु करावी. परिसरातील टवाळखोरांवर कारवाई होत नसल्याने छेडछाडीचे प्रकार वाढत आहे.

पोलिसांकडून कारवाई नाही

टवाळखोरांवर कारवाई थंडावली असल्याने शहरात टवाळखोरींचे प्रमाण वाढले आहे. निर्भया पथकाकडून शाळा परिसरात गस्त होत नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत.गस्त वाढवल्यास पोलिसांना बघून टवाळखोरी कमी होण्यास मदत होणारआहे.

बातम्या आणखी आहेत...