आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शाळा क्र. 71 तर्फे प्रदूषण जनजागृती

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ ने गणेशोत्सवकाळात प्रदूषण राेखण्याचे आवाहन पथनाट्यांद्वारे केले. सण-उत्सवकाळात नद्यांचे विविध प्रकारे प्रदूषण होत असते. हेच प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे शालेय मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांंतर्गत कागदी पिशव्या तयार केल्या. पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवकाळात निर्माल्य नदीत न टाकता कागदी पिशव्यांमध्ये जमा करून निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन विद्यार्थी व शिक्षकांनी परिसरातील नागरिकांना केले.

गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी, नद्यांचे महत्त्व जनमानसांत बिंबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौकाचौकात जाऊन "माणसाने छळले नदीला’ व नद्या संवर्धन : काळाची गरज’ या पथनाट्यांद्वारे जनजागृती केली. नळाच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. शाडू मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करावी. गणेश विसर्जन कृत्रिम तलावांत करावे, असेही आवाहन नागरिकांना केले.

शिक्षिका रूपाली ठोक यांनी या उपक्रमाची व पथनाट्यांची पार्श्वभूमी विशद केली. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी नदी प्रदूषणासाठी मानव जबाबदार असल्याचे प्रतिपादन करत प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे, असे आवाहन केले. यात सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रमिला देवरे, योगिता खैरे, सुनीता धांडे, किसन काळे, विनोद मेणे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...