आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहाराच्या कामात दिरंगाई:नाशकात महानगरपालिका समोर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे धरणे आंदोलन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त आत्राम साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात उच्च न्यायालयाने आपणास 21 दिवसांच्या आत महिला बचत गटांना प्रशासकीय प्रक्रिया राबवून शालेय पोषण आहाराचे काम वाटपाचे करण्याचा निर्णय दिला असताना मनपाच्या वतीने 26 मे 2022 रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.

त्यानुसार दि 16 जून 2022 रोजी निविदा उघडून छाननी करून प्रक्रिया राबविली गेली. ह्या प्रक्रियेला तीन महिन्यांचे वर कालावधी होऊन देखील याबाबत महिला बचत गटांना शालेय पोषण आहार काम वाटपाचे आदेशाबाबतची कारवाई होताना दिसत नसल्याचेही म्हटले आहे.

आहाराचे वाटप नाही

त्याप्रमाणे अपेक्षित किचनशेड भाड्याने घेऊन मनपा प्रशासनाला अपेक्षित निविदेत असलेल्या अटी शर्तीचे पालन करत किचनशेड रचना तयार केली. त्यानंतर मनपा प्रशासनाचे काही अधिकारी व कर्मचारी यांना स्थळ पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर झाला असला तरी शालेय पोषण आहाराचे वाटत नाही ही दुर्दैवी बाब असल्याचेही म्हटले आहे.

मानसिकता बिघडली

या सर्वच प्रक्रियेला जवळपास तीन महिन्यांचे कर्ज काढून भरण्याची वेळ आली असून याबाबत बचत गटांच्या महिला प्रचंड तणावाखाली असून त्यांची मानसिकता पुर्णपणे बिघडली. यावर तात्काळ निर्णय घेऊन बचतगटांच्या न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळाला आश्वासन

तात्काळ निर्णय घेऊन महिला बचत गटांना शालेय पोषण आहार काम वाटपाचे आदेश देण्याची विनंती केली असता मनपाचे अतिरिक्त आयुक्त आत्रम यांनी सप्टेंबरच्या पहिल्या हप्तात करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले असले तरी त्याची अंमलबजावणी केली नाही.

यांची उपस्थिती

यावेळी ज्ञानेश्वर काळे, अशोक शेंडगे, ईशाक कुरेशी, संजय खैरनार, दिनेश उन्हावणे, अॅड विकास पाथरे, तुळशीराम जाधव, अनिसा सैफी, अॅड मिना वाघ, दिलावर मनिय्यार, मंदा वाघ, अजिसा शेख, सलमा शेख, मिना शेख, शाईन शेख, माया पगारे, सुफीया खान, लता गुंजाळ आदी सहभागी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...