आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​ पालकमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश:शाळकरी विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; पाेलिस काय करतात, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. फरांदे यांचा प्रश्न

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप करत भाजपाच्या आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी शहरातील इयत्ता ९ वी आणि १० वीतील मुले सर्रासपणे अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. ड्रग्ज् अन् कुत्ता गोळी सारख्या पदार्थांवर बंदी असताना हे पदार्थ मुलांना मिळतात कुठून? पोलिस काय करत आहे? असा प्रश्न विचारत पोलिसांनी यावर त्वरीत अॅक्शन प्लान तयार करून करुन कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

त्यावर पालकमंत्री दाद भूसे यांनी ड्रग्ज्, गुत्ता गोळी ्अन् हुक्का पार्लरवर कारवाई करण्याच्या सूचना देत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना दिल्या.

शहरात अल्पवयीन मुलं अमली पदार्थ्यांच्या आहारी गेली आहेत. ठरावीक पानटपरींवर विशिष्ट स्वरुपात रात्री नाॅकींग केले की लागलीच त्यांना हे पदार्थ सहजरित्या उपलब्ध करुन दिले जात असल्याचे आ. फरांदे यांनी सांगत पोलिसांना याबाबत कल्पना कशी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री भूसे यांनी यात गांभीर्यांने लक्ष देण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या. आयुक्तांनीही यावर कारवाई करण्यासाठी नियोजन यापूर्वीच सुरू झाले असून त्याचा परिणाम लवकरच दिसेल, असे सांगितले.

तसेच नागरिकांसाठी १०० नंबर सोबतच ११२ हा टोल फ्री नंबर उपलब्ध असून त्यावर माहिती देण्याचे आवाहन केले. बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नहरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक शहाजी उमप आदींसह आमदार बैठकीस उपस्थित होते.

वसतिगृहांची तपासणी : पंचवटीतील वसतिगृह चालकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद बैठकीत उमटले. त्यावर शहरासह जिल्ह्यातील अधिकृत व अनधिकृत वसतिगृहांची तपासणी अन् चाैकशी सुरु केली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या अंतर्गत समिती स्थापली आहे. परवानगी नसेल अशांनी आदिवासी विकास, समाजकल्याण आणि बालविकास विभागाकडून परवानगी देण्याची व्यवस्था केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आमदारांनी केल्या विविध विषयांवर या सूचना
आ. हिरामण खाेसकर : गतवर्षीसह यंदा प्राप्त निधी आणि खर्च झालेल्या निधीची संपूर्ण माहिती द्यावी.

आ. अॅड. राहुल ढिकले : मनपाची आर्थिक स्थिती बरी नसल्याने शहरातील मूलभूत सुविधांसाठी जिल्हा नियोजनद्वारे निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यास अपेक्षित उपाययोजनांसाठी स्वतंत्र बैठक घेऊन अपघातप्रवण ब्लॅकस्पाॅट त्वरित निकाली काढावे.
आ. डाॅ. राहुल आहेर : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी-नागरिकांना अद्यापही भरपाई मिळाली नसून ती त्वरित शासनाकडून प्राप्त करून घेत वितरीत करावी.

आ. सीमा हिरे : दलितोत्तर भागातील योजनांना निधी देताना ही कामे आचारसंहिता लागण्यापूर्वीच सुरू करा.

बातम्या आणखी आहेत...