आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक‎ दृष्टिकोन:मातोश्री एज्युकेशन इंग्लिश‎ मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिन‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातोश्री एज्युकेशन सोसायटी‎ संचलित इंग्लिश मीडियम स्कूल‎ अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या‎ विद्यार्थ्यांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचे‎ प्रकल्प तयार करत आगळ्या‎ वेगळ्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा‎ केला.‎ विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात‎ शाळेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक‎ दृष्टिकोन विकसित करण्यासाठी‎ विविध प्रयोगातून दैनंदिन‎ जीवनातील विविध वस्तूंमधील‎ वैज्ञानिक सिद्धांत समजावून‎ सांगितले.

तसेच प्रयोगशाळेतील‎ विविध उपकरणांची माहिती जाणून‎ घेतली. स्वरा रुमने, संचिता‎ लव्हाळे, अनुष्का जाधव, अक्षदा‎ पेखळे, संगीता लोधी या विद्यार्थ्यांनी‎ विविध प्रतिकृतींच्या मदतीने‎ विज्ञानातील नियम स्पष्ट करून‎ सांगितले. संस्थेचे प्रमुख विजय‎ कंक, मुख्याध्यापक नीलेश जाधव,‎ उपमुख्याध्यापिका आरती अनवट‎ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन पल्लवी हिरे यांनी तर‎ आभार प्रदर्शन प्रतिभा कुलथे यांनी‎ केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी‎ समीक्षा सावखेडकर, प्रियंका‎ तेल्हुरे, श्वेता गडाख यांनी परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...