आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशाने यंदाही विज्ञान समितीतर्फे वाघेरा आश्रमशाळेत शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात तीन गटात इयत्ता चाैथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी 67 विज्ञान प्रतिकृती मांडल्या. साैर उर्जा, भूमिगत सिंचन प्रकल्प, आदर्श व स्वयंपूर्ण खेडी अशा विविध विषयांवर प्रकल्प सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. संशोधनातून सादर केलेल्या प्रकल्प नाविण्यपूर्ण होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन हरसूल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून खुशवंतसिंह पाटील व गजानन लोहार यांनी काम पाहिले. यावेळी शाळेतील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन पवार व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप चौधरी उपस्थित होते.
प्रदर्शनात सादर केलेल्या सर्व विज्ञान प्रतिकृतींची पाहणी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान समिती प्रमुख प्रा. भरत पाटील, प्रा. उज्वला पवार, प्रदीप मोरे, संतोष खैरनार, तसेच केशव सापटे, मनोज सहारे, निलेश पवार यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. साैर उर्जेचा विधायक वापर असो की, ग्रामीण भागातील गावांना स्वयंपूर्ण बनविणाऱ्या प्रकल्प. दुष्काळावर मात करणारा आधुनिक सिंचन प्रकल्पाने या प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गाैरविण्यात आले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस मदत होईल, असे मत सहाय्यक निरीक्षक वारुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.