आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन:विद्यार्थ्यांकडून 67 प्रकल्पांचा विज्ञानाविष्कार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान समितीतर्फे वाघेरा आश्रमशाळेत शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात तीन गटात इयत्ता चाैथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ६७ विज्ञान प्रतिकृती मांडल्या. साैरऊर्जा, भूमिगत सिंचन प्रकल्प, आदर्श व स्वयंपूर्ण खेडी अशा विविध विषयांवर प्रकल्प सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. संशोधनातून सादर केलेल्या प्रकल्प नावीन्यपूर्ण होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन हरसूल पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून खुशवंतसिंह पाटील व गजानन लोहार यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याध्यापक नितीन पवार व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप चौधरी उपस्थित होते. प्रदर्शनात सादर केलेल्या सर्व विज्ञान प्रतिकृतीची पाहणी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी विज्ञान समिती प्रमुख प्रा. भरत पाटील, प्रा. उज्ज्वला पवार, प्रदीप मोरे, संतोष खैरनार, तसेच केशव साप्टे, मनोज सहारे, नीलेश पवार, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...