आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारहदारीस व रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या १० ते १५फूट उंचीची चार झाडे जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या उद्यान विभागाने काढून त्यांचे गेल्यावर्षी पालिकेच्या माेकळ्या जागेत पुनर्राेपण करण्यात आले हाेते. आता त्या झाडांना पालवी फुटल्याने समाधान व्यक्त हाेत आहे. रस्ता रुंदीकरणात रहदारीस अडथळा ठरणारी पिंपळ, कडुलिंब व दोन उंबराचे झाडे ताेडण्यात येणार हाेती.
मात्र सातपूर विभागातील उद्यान विभागाने शास्त्राेक्त पद्धतीने ही झाडे काढली हाेती. ही जुनी झाडे पाइपलाइनरोडवरील नाईस वजनकाट्यामागील पालिकेच्या माेकळ्या जागेवर एक वर्षापूर्वी लावण्यात आली हाेती. उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, अभियंता राजेंद्र सोनवणे, उद्यान निरीक्षक भविष्या निकम, जगदीश लोखंडे, कुणाल पाटील यांनी झांडांचे योग्य संगोपन केल्याने आता त्या झाडांना पालवी फुटली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.