आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयातील चार रोव्हर्स व सहा रेंजर्स ची तसेच युनिट लिडर यांची आजादी का अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जांबोरीसाठी दक्षिण कन्नड, मुडबिदरी, कर्नाटक येथे निवड झालेली आहे. यामध्ये विविध देशातील रोव्हर- रेंजर्स सहभागी होणार आहे. भारतातील सर्व राज्य यात सहभागी होणार आहे.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन विविधतेतील एकतेचा संदेश जगाला देणार आहे. सांस्कृतिक मुल्यांची देवाण-घेवाण या द्वारे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण जनजागृती, समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, साहसी उपक्रम, बायोलॉजिकल पार्क, कृषीप्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, योगासन, मॅरेथान व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यशस्वी रोव्हर-रेंजर्सला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.कुशारे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे ऑफिस सुपरीडंट राजाराम गायकर, अकाउंट आबा थोरात, आयोजक डॉ. मिनाक्षी गवळी, प्रा. किरण जाधव, प्रा. हेमंत काळे, विजू पाटील, वैभव खंडागळे उपस्थित होते.
यशस्वी रोव्हर-रेंजर्स मध्ये विद्या किरण नेमाडे, प्रतिक्षा शिवाजी सुरुडे, शृती विलास वखरे, वैष्णवी सुनिल जाधव, ज्ञानेश्वरी गोरख देवरे, जयश्री मानिक गुंजाळ, ऋषिकेश भिला हिरे, चेतन सुनील चव्हाण, विनायक भारत शिरसाठ, प्रितेश संदीप जैन यांचा समावेश आहे. कर्नाटक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जांबोरी कॅम्प मध्ये सदर वरील सर्व उपक्रमात विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सदर रोव्हर-रेंजर्सला जिल्हा भारत स्काऊट गाईड चे जिल्हा संघटक राजेंद्र महिरे, जिल्हा संघटक गाईड हेमांगी देवरे, युनिट लिडर डॉ. मीनाक्षी गवळी, शुभम बेझेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी रोव्हर-रेंजर्स चे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीनभाऊ ठाकरे, मविप्र संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, श्री. रमेश आबा पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के कुशारे, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र झनकर, डॉ. मनीषा गडाख, डॉ. पगारे, युनिट लिडर डॉ. मीनाक्षी गवळी, आय.क्यु.ए.सी को- ऑर्डिनेटर डॉ. ज्ञानेश्वर पवार सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.