आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:डिप्लोमासाठी आज दुसरी निवड यादी; पसंतीच्या काॅलेजकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीनंतरच्या डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी शुक्रवारी (दि. १६) निवड यादी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत पसंतीचे काॅलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या यादीकडे लागले आहे. डी. फार्मसी प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रिया जून महिन्यात सुरु झाली होती. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देण्यात आली.

तब्बल पाच ते सहा महिने केवळ प्रवेश अर्जांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होती. अखेर डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार ८ डिसेंबरपर्यंत पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवण्यासाठी मुदत होती. तर ९ डिसेंबरला निवड यादी झाली. त्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १२ डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली होती. त्यानंतर १३ डिसेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर झाला. १४ व १५ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी पसंतीच्या काॅलेजचे आॅप्शन भरले. आता १६ डिसेंबरला दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर होऊन त्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १७ ते १९ पर्यंत प्रवेशाची संधी असेल.

बातम्या आणखी आहेत...