आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिकमध्ये दोन सत्रांत चालणार दुय्यम निबंधक कार्यालये ; सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुविधा

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक वकील संघाच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांना भेटून दुय्यम निबंधक कार्यालय दोन सत्रात सुरू करण्याची मागणी केली असता त्यांनी तातडीने त्यास मंजुरी दिली. आता नाशिकतील दुय्यम निबंधक कार्यालये सकाळी ७ पासून ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन सत्रात सुरू राहणार आहेत. वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, उपाध्यक्ष वैभव शेट्ये, हेमंत गायकवाड, संजय गिते यांच्या नेतृत्वाखाली नोंदणी कार्यालयात हर्डीकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे उपस्थित होते. यावेळी दस्त नोंदणीसाठी सर्व्हर वारंवार बंद पडते, तासनतास ग्राहकांसह वकिलांना करावी लागणारी प्रतीक्षा, महापालिका हद्दीत चार नवीन दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करावी, वकील संघाला ई- रजिस्ट्रेशन परवाना मिळावा या विषयांवर चर्चा झाली. त्यावर हर्डीकर यांनी सांगितले की, सर्व्हर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यात सर्व्हर सुरळीतहोईल, तसेंच नाशिक महापालिका हद्दीतील दोन कार्यालये सकाळ-संध्याकाळ शिफ्टमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल. वकील संघाच्या कार्यालयात ई -रजिस्ट्रेशन परवाना देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. वकील संघाच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. खजिनदार कमलेश पाळेकर, सदस्य शिवाजी शेळके, प्रतिक शिंदे, महेश यादव आणि वैभव घुमरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...