आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:तडीपार गुन्हेगाराकडून कुकरी जप्त; पथकाची कारवाई

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून प्राणघातक हत्यार जप्त करण्यात आले. पाथर्डी फाटा येथे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. हर्षद सुनील पाटणकर (रा. बेथेलनगरी, शरणपूररोड) असे या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असताना तडीपार केलेला संशयित पाटणकर हा पाथर्डी फाटा येथे येणार असल्याची माहिती पथकाचे समीर चंद्रमोरे यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली. अंगझडतीत त्याच्याकडे कुकरी मिळून आली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, माणिक गायकर, सुनील माळी आदींच्या पथकाने उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. संशयिताला शहर जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपार केले आहे. हद्दपारीच्या कालावधीत तो शहरात वास्तव्य करत होता.

बातम्या आणखी आहेत...