आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘आविष्कार’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेत अंतिम वर्षात शिकणाऱ्या अथर्व निकम, भूषण कर्पे व तेजस मोरे यांच्या प्रकल्पाची उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या चार प्रकल्पात निवड झाली.
आविष्कार स्पर्धेत महाविद्यालयीन स्तरापासून ते प्रादेशिक स्तरावर प्रकल्पांचे परीक्षण केले जाते. अंतिम स्तर हा विद्यापीठ स्तर असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणपणे तीन हजार प्रकल्प या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातून विद्यापीठ स्तरापर्यंत २३३ प्रकल्प पुढे आले. ज्यात सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाचा WISOR हा प्रकल्प पहिल्या चार प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला . हा प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतर सावित्रीबाई फुले रिसर्च पार्कमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोखले शिक्षण संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.