आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:खेलो इंडिया युथ गेम्ससाठी तनिषा कोटेचा, सायली वाणीची निवड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेसाठी नाशिकच्या तनिषा कोटेचा व सायली वाणीची महाराष्ट्र राज्याच्या टेबल टेनिस संघात निवड झाली. तनिषा हिची दुसऱ्यांदा तर सायली वाणी हीची पहिल्यांदा खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.

त्या दोघी प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या दोघी नुकत्याच स्पेन आणि बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील सहभागी झाल्या होत्या.त्यांच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, खजिनदार राजेश भरवीरकर, संजय वसंत, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे आदींनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...